नमस्कार मित्रांनो,
बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मराठीत तांत्रिक माहिती देणारी वेबसाईट शोधत होतो. पण फार कमी पर्याय उपलब्ध असलेले दिसले. त्यावरील माहितीही फार मर्यादित स्वरुपात होती. त्यामुळे ठरवलं की या साठी एखादा ब्लॉग सुरु करावा. या ब्लॉगचा उद्देश असेल काही Tips, Tricks आणि त्यासोबत मला आवडलेले आणि उपयोगी असणारे Applications तुमच्या सोबत शेअर करणे. परत सांगावं वाटतं की या ब्लॉगचा उद्देश आहे “तांत्रिक माहिती मराठीत देणे”. ‘मराठी भाषा’ हा उद्देश नाही. त्यामुळे बरेचसे शब्द इंग्रजी मधलेच वापरले जातील. उगाच इंटरनेट साठी अंतरजाल वगैरे शब्द वापरून क्लिष्टता वाढवणार नाही. कुणी मराठीचा जास्त आग्रह धरू नये.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ब्लॉगला लाईक करायला विसरलात तरी हरकत नाही, पण जर तुमच्या जवळही काही उपयुक्त माहिती असेल तर ती येथे शेअर करायला मात्र विसरू नका.
तर...चला, आजपासून काहीतरी नवीन शिकायला सुरवात करूया!
🙏
test comment
ReplyDeleteTest Comment.
Delete