share

If you have any quotation about this tips, let me know by commenting. Thank You ___पद्मनाभ

Mac OS

Friday, 15 June 2018

Web To PDF

मी या वेळेस "Out Of Office" मेसेजबद्दल माहिती देणार होतो. पण सकाळीच मित्राचा फोन आला. "नेटवर काहीतरी चांगला लेख वाचनात आलाय. एखादे सोपे ॲप असेल तर सांग. म्हणजे लेखाचे PDF करुन ठेवता येईल." मग त्याला थोडी-फार माहिती दिली. विचार केला अगदी छोटी आणि सर्वांना माहित असलेली माहितीच आज येथे 'मिपावर शेअर करावी. ज्यांना माहित नाही त्यांना याचा ऊपयोग होईल. "Out Of Office" मेसेजविषयी पुढच्यावेळेस लिहिन.
आज बाजारात Android, Windows आणि iOS साठी अनेक PDF ॲप्स ऊपलब्ध आहेत. त्यात अनेक ऊपयुक्त फिचर्सही आहेत. जसे Merge & Split, Watermark, Stamp, Rotate/arrange/delete pages, Signature & Form filling, Compress इत्यादी. अगदी भरपुर पर्याय ऊपलब्ध आहेत. हे झाले PDF बद्दल. आपण Pages, Word, Numbers, Excel वगैरे फाईल सेव्ह करताना PDF मध्ये सेव्ह करु शकतो. पण जेंव्हा नेटवर एखादा सुंदर लेख वाचनात येतो तेंव्हा तो पुर्ण लेख PDF मध्ये कसा कन्हर्ट करायचा? अर्थात त्यासाठीही अनेक ॲप्स आहेत. पण iOS मध्ये inbuilt सुविधा ऊपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्ही website नाही तर तुमच्या iOS device वर असलेले काहीही PDF मध्ये कन्व्हर्ट करु शकतो. Pages, Notes, Numbers, Keynote ईतकेच काय Photo आणि email चे देखिल PDF बनवू शकता. आज आपण webpage कसे PDF मध्ये कन्व्हर्ट करायचे ते पाहूयात.
1. प्रथम तुम्हाला ज्या webpage चे PDF करायचे आहे ते सफारीमध्ये ऊघडा. एक मात्र काळजी घ्या, जे पेज तुम्हाला PDF मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे ते पुर्णपणे ओपन होवूद्या. कारण पेजची लांबी जास्त असल्याने आपल्या लक्षात येत नाही की पेज पुर्ण लोड झाले आहे की नाही. त्यासाठी पुर्ण पेज स्क्रॉल करुन पहा. अर्धवट लोड झालेल्या पेजची PDF सुध्दा अर्थवटच होईल.
2. पेज जर पुर्ण लोड झाले असेल तर Safari च्या वरील ऊजव्या बाजुस 'शेअर' हे बटन असेल त्यावर क्लिक करा. हे शेअर बटन 'चौकोनातून वरच्या बाजुने बाहेर आलेला बाण' असे काहीसे दिसते. साधारण असे. पण बाण चौकोनाच्या पोटातून थोडासा बाहेर आलेला असतो.


3. 'शेअर बटन' क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय ऊपलब्ध होतील. हे पर्याय तुम्ही कसे ॲरेंज केले आहेत त्या क्रमाणे समोर येतील. तसेच तुम्ही कोणकोणती ॲप डाऊनलोड केली आहेत, त्यातली PDF ला सपोर्ट करणारी ॲप्स समोर येतील. मी लावलेला क्रम हा Telegram, Mac Mail, Spark Mail, iBook या सारखा आहे. या ॲप्सच्या रांगेखाली Safari चे पर्याय ब्लॅक & व्हाईट मध्ये येतील. Print, Add bookmarks, Add reading list वगैरे.


4. वरील पर्यायांपैकी 'Print' या पर्यायावर क्लिक करा. Print वर क्लिक केले असता Printer Options ची विंडो ओपन होईल. ज्यात Printer निवडने, किती कॉपीज् काढायच्या आहेत? कोणकोणत्या पानांच्या प्रिंट काढायच्या वगैरे पर्याय असतील. तसेच खाली Print Preview असेल. पण आपल्याला Print काढायची नाहीए. त्यामुळे या सगळ्या पर्यायांकडे दुर्लक्ष करा. खाली जो Preview असेल त्यात तुमचे वेबपेज जितक्या पानांचे असेल त्यातले पहिले पान असेल. ते स्लाइड केले तर त्यामागे बाकीची पाने असतील. तर त्यांना तेथेच असुद्या. जे पहिले पान दिसेल त्याला दोन बोटाने झुम करा.


5. तुम्ही जेंव्हा पहिले पान झुम कराल तेंव्हा PDF फुल स्क्रिनमध्ये ओपन होईल. तसेच स्क्रिनच्या ऊजव्या बाजुला बाकीच्या पानांचे थंबनेल्स दिसतील. आता या थंबनेल्सच्या वरती पुन्हा 'शेअर' बटन दिसेल. (iOS किंवा macOS मध्ये तुम्ही कोणतेही ॲप ऊघडले तरी 'शेअर बटन' त्याच जागेवर असते.)


6. आता शेअर बटन दाबल्यावर परत तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. आता तुम्ही ठरवा तुम्हाला ही तयार झालेली PDF कुठे शेअर करायची आहे. तुम्ही iPhone वर PDF तयार केली असेल तर WhatsApp चा पर्यायही दिसेल. iOS किंवा macOS वापरताना 'फाईल मॅनेजर' ॲप्स तुम्हाला गरजेची असतात. Apple चे स्वतंत्र Files नावाचे ॲप आहेच. पण मला "File Master" हे ॲप आवडते. (या File Master चा स्क्रिन शॉट मी दिलाच आहे पण याबद्दल सविस्तर माहिती पुन्हा कधीतरी देईन.) तुम्ही तयार झालेली PDF फाईल मास्टर मध्ये सेव्ह करा किंवा iBook मध्ये सेव्ह करा.


हे सगळे लिहायला, वाचायला जरी जरा कटकटीचे वाटले तरी या सर्व PDF Converting Process ला फार तर आठ ते दहा सेंकद लागतात. एकदा तुमच्याकडे विशिष्ट विषयांवरचे किंवा तुमच्या आवडते अनेक PDF तयार होतील तेंव्हा त्यांना Merge करुन तुम्ही e-book बनवू शकता. त्याचे कव्हर डिझाइन करु शकता. मित्रांना पाठवू शकता. मला आवडलेल्या 'मिपावरील गझलांचे बरेच मोठे कलेक्शन करुन मी त्याचे e-book करुन ते iBook वर स्टोअर करुन ठेवले आहे. मला जेंव्हा फार कंटाळा येतो तेंव्हा या गझल काढून मी वाचत बसतो. एकदा, दोनदा आणि पुन्हा पुन्हा.

आपला "out of office" हा विषय राहिलाच मागे. असो. पुढच्यावेळेस त्यावर सविस्तर बोलू.

No comments:

Post a Comment

lke

Share With

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...

                                                          नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि ...

Popular Posts