मला बरेचदा काम करताना वाटायचं की काम करताना डेस्कटाॅपवर अशी एखादी स्पेस हवी जिथे मला हव्या असतील त्या फाइल्स ठेवता येतील आणि जिथे हव्या आहेत तिथे सहज ॲड करता येतील. ऊदा. जर मी मेल कंपोज करत असताना जर मला मेलमधे काही इमेज ॲड करायच्या असतील, किंवा टेलेग्राम सारख्या ॲप मधून मित्राला फोटो पाठवायच्या असतील तर सहजतेने या फाइल्स किंवा फोटो मला डायरेक्ट त्या त्या ॲप मधे ड्रॅग करता येतील. हेच काम Yoink ने खुप सोपे केले. iMovie मधे काम करत असताना मला हव्या असलेल्या वेगवेगल्या फोल्डर मधील क्लिप मी Yoink मधे ड्रॅग करुन मग त्या हव्या असतील तशा iMovie मधे घेऊ शकतो.
जसजसे नविन अपडेट येत आहेत, बरेच ॲप्स ड्रॅग ॲंड ड्रॉप’ वर जास्त भर देत आहेत. तसेच सगळे ॲप्स आता फुल स्क्रिन असल्यामुळे योइंक जास्त ऊपयोगी पडते. वापरुन पहा.
थोडक्यात Yoink आपल्यासाठी क्लिपबोर्डचं काम करतो. तुम्ही Yoink window डेस्कटाॅपच्या कोणत्याही भागात सेट करु शकता. विंडोजची साईज आणि बिहेवीअर सेट करू शकतो. हे ॲप तुम्हाला ट्रायल व्हर्जन मधे मिळू शकते. आवडले तर तुम्ही ट्रायल पीरीअड संपल्यानंतर पर्चेस करू शकता. हे ॲप पुर्वी थर्ड पार्टीकडून डाऊन लोड करावे लागत होते पण आता Yoink ॲप स्टोअर वर ऊपलब्ध आहे.
मला हे ॲप आवडले. रोज त्याचा मला ऊपयोग होतो. तुम्हालाही हे आवडेल ही आशा.
No comments:
Post a Comment