share

If you have any quotation about this tips, let me know by commenting. Thank You ___पद्मनाभ

Mac OS

Monday, 31 December 2018

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...



                                                         नमस्कार मित्रांनो,
बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि iPhone) विषयी मराठीत तांत्रिक माहिती देणारी वेबसाईट शोधत होतो. पण फार कमी पर्याय उपलब्ध असलेले दिसले. त्यावरील माहितीही फार मर्यादित स्वरुपात होती. त्यामुळे ठरवलं की या साठी  एखादा ब्लॉग सुरु करावा. या ब्लॉगचा उद्देश असेल काही Tips, Tricks आणि त्यासोबत मला आवडलेले आणि उपयोगी असणारे Applications तुमच्या सोबत शेअर करणे. परत सांगावं वाटतं की या ब्लॉगचा उद्देश आहे “तांत्रिक माहिती मराठीत देणे”. ‘मराठी भाषा’ हा उद्देश नाही. त्यामुळे बरेचसे शब्द इंग्रजी मधलेच वापरले जातील. उगाच इंटरनेट साठी अंतरजाल वगैरे शब्द वापरून क्लिष्टता वाढवणार नाही. कुणी मराठीचा जास्त आग्रह धरू नये. 

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ब्लॉगला लाईक करायला विसरलात तरी हरकत नाही, पण जर तुमच्या जवळही काही उपयुक्त माहिती असेल तर ती येथे शेअर करायला मात्र विसरू नका.


तर...चला, आजपासून काहीतरी नवीन शिकायला सुरवात करूया!

🙏

Sunday, 17 June 2018

Batch resize photos

या लेखात आज अजुन एक Automator Workflow पाहूयात.

आपल्याला बऱ्याचदा सोशल साईटवर इमेज अपलोड कराव्या लागतात. उदाहरणार्थ आपल्या 'मिपावर फोटो टाकायचे असतील तर अगोदर दुसऱ्या एखाद्या साईटवर अपलोड करुन येथे त्या ईमेजची लिंक द्यावी लागते. अर्थात लिंक बॉक्समध्ये मिपा तुम्हाला साईज विचारते. (मिपा सदस्यांसाठी फोटो टाकणे ही बरीच मोठी समस्या आहे.) पण ईतर साईटस् वर आपल्याला ईमेज resize करावी लागते. पण जेंव्हा एकापेक्षा जास्त ईमेज अपलोड करायच्या असतात तेंव्हा प्रत्येक ईमेज रिसाइज करणे जरा त्रासदायक ठरते. त्यासाठी आज आपण Automator वापरुन एक अॅप तयार करु. ज्या अॅपवर तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या ईमेज ड्रॅग केल्याअसता सेट करुन ठेवलेल्या फोल्डरमध्ये, सेट केलेल्या साईजमध्ये ईमेज सेव्ह होतील.


नेहमी प्रमाणे Automator ओपन करा. (Applications menu मध्ये जाऊन किंवा Spotlight मधून.)
जेंव्हा Template chooser ओपन होईल तेंव्हा Application वर क्लिक करुन Choose वर क्लिक करा.

1. Library मध्ये Files and Folders वर क्लिक करा. ऊजवीकडील पॅनमधून 'Copy Finder Items' हा पर्याय मेन विंडोमध्ये ड्रॅग करा.
2. 'To’ समोरील ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा. त्यातल्या अनेक पर्यायांमधून Other या पर्यायावर क्लिक करा आणि नविन फोल्डर तयार करुन त्याला Resized’ नाव द्या.

3. File and Folder मधूनच पुन्हा 'Rename finder Items’ हा पर्याय workflow मध्ये ड्रॅग करा.
4. आता Library मध्ये Photos वर क्लिक करा. ऊजव्या बाजूच्या पॅनमधून ’Scale Image’ वर क्लिक करा आणि Workflow मध्ये ड्रॅग करा. ड्रॅग केल्यानंतर warning dialog box ऊघडली जाईल. त्यात Don’t Add वर क्लिक करा. कारण आपण वरील workflow मध्ये याची action अॅड केली आहेच.


5. जर तुम्हाला ठरावीक साईज हवी असेल तर box मध्ये तुम्हाला हवी असलेली साईज टाका. मी येथे 600 pixels घेतली आहे. तुम्ही Percentage हा पर्याय देखील निवडू शकता.
आता हा workflow डेस्कटॉपवर save करा. आधिच्या लेखात सांगितल्या प्रमाणे त्याला योग्य तो आयकॉन द्या जो पटकन समजेल.



जेंव्हा जेंव्हा तुम्हाला ईमेज resize करायच्या असतील तेंव्हा हव्या त्या ईमेज सिलेक्ट करुन या अॅप वर ड्रॅग करा. तुम्ही ठरवलेल्या साईजमध्ये सगळ्या ईमेज 'Resized' या फोल्डर मध्ये save झालेल्या असतील

AirDrop

फाईल्स शेअर करण्यासाठी प्रत्येकवेळेस Finder मध्ये जाऊन file sharing feature ऊघडायचे किंवा +space वापरुन Spotlight search मधून AirDrop लाँच करणे या द्राविडी प्राणायामापेक्षा जर AirDrop तुमच्या डॉकवरच असेल तर? जशी तुम्हाला वारंवार लागणारी ॲप्स तुम्ही डॉकवर place करता तसे? तर या लेखात आपण AirDrop डॉकवर कसे place करायचे ते पाहू
AirDrop डॉकवर place करायचे म्हणजे खरं तर AirDrop feature चा शॉर्टकट place करायचा. पण हे feature नेहमी system folder मध्ये असते आणि तेही by default हिडन. म्हणजे सहज शोधायचे म्हटले तर दिसणार नाही. macOS महत्वाचे फोल्डर हिडन ठेऊन एकप्रकारे काळजीच घेत असते. पण शोधायचे म्हटल्यावर काहीही सापडतेच की. त्यासाठी पहिल्यांदा-

  1. Finder ओपन करा.
  2. आता मेन्यू बारमध्ये "Go" वर क्लिक करा आणि "Go To Folder" वर क्लिक करा. यासाठी ++G हा किबोर्ड शॉर्टकट वापरा. (मी प्रत्येक लेखात शक्य तिथे किबोर्ड शॉर्टकट देतो आहे. कारण एकदा किबोर्डची सवय लागली की 'माऊसपेक्षा जास्त गतीने काम करता येते.)
  1. सर्च विंडोसारखीच दिसणारी विंडो ओपन होईल. त्यामध्ये खाली दिलेला directory path जसा आहे तसा टाका (कॉपी पेस्ट केला तरी चालेल.) आणि एंटर (return) दाबा. तुमच्या समोर Application ची विंडो ओपन होईल.
/System/Library/CoreServices/Finder.app/Contents/Applications/



  1. या विंडोमध्ये "AirDrop.app" शोधा. बहुधा हे सुरवातीलाच दिसेल. हे AirDrop.app ड्रॅग करा आणि Dock वर तुम्हाला हवे तेथे place करा.
  1. जेंव्हा AirDrop डॉकवर व्यवस्थीत place होईल तेंव्हा /CoreServices/Finder.app/Contents/ folder बंद करा
  2. आता जेंव्हा जेंव्हा तुम्ही डॉकवरच्या AirDrop वर सिंगल क्लिक कराल तेंव्हा त्वरीत AirDrop Window ओपन होईल आणि डिव्हाईस सर्च करुन जवळ असलेले डिव्हाईस तुम्हाला दिसायला लागेल.

6. तुम्ही जेंव्हा कोणत्याही File चे Quick View ओपन करता. (Just press 'Space' for Quick View.) तेंव्हा क्विक व्ह्यूच्या वरील डाव्याबाजूला शेअरचे बटन दिसते, त्यावर क्लिक करुनही तुम्ही फाईल AirDrop मध्ये शेअर करु शकता.


ही छोटी ट्रिक वापरा आणि AirDrop वापरुन पहा. 


Friday, 15 June 2018

AutoResponder (Mail App)

macOS च्या Mail App मध्ये AutoResponder कसे सेट करायचे ते या लेखात पाहुयात.
AutoResponder मुळे तुम्ही "out of office" मेसेज सेट करु शकता. जेंव्हा तुम्ही ऑफीसमध्ये नसता किंवा काही कारणामुळे तुम्ही तुमचा inbox ॲक्सेस करु शकत नाही तेव्हा AutoResponder चा ऊपयोग होतो. मला शक्यतो ईतक्या मेलला ऊत्तरे द्यावी लागत नाही. निदान अगदी त्वरीत ऊत्तर द्यावे असे फार क्वचित मेल माझ्या इनबॉक्समध्ये येतात. पण माझ्या मित्रमंडळींमध्ये आणि काही क्लाएंटमध्येही एक दोन जण असे आहेत की त्यांच्या मेलला ऊत्तर नाही दिले की त्यांचा इगो दुखावतो. त्यामुळे मला AutoResponder ऊपयोगाला येते. AutoResponder च्या सेटींगमधे अनेक पर्याय असल्याने, जसे तुम्ही विशिष्ट मेल आयडीला विशिष्ट मेसेज सेट करु शकता, सब्जेक्ट, डोमेन, तारीख-वार, ग्रुप असे अनेक पर्याय ऊपलब्ध असल्याने मी काही ठराविक मित्रांना पिडण्यासाठी विचित्र मेसेज सेट करुन ठेवतो. जसे "ऊत्तर देऊ शकत नाही. फारच इमर्जन्सी असल्यास कृपया 'इमर्जन्सी सर्व्हीसला' फोन करणे किंवा तुमच्या मेलला योग्य पध्दतीने Trash ची वाट दाखवण्यात आली आहे वगैरे. दिवाळी, नुतन वर्ष यासारख्या प्रसंगी मला ही सुविधा बरीचशी ऊपयोगाला येते. हे झाले AutoResponder चे सर्व साधारण ऊपयोग. पण याचा ऊपयोग करुन तुम्ही कुठूनही तुमचा iMac तुमच्या iPhone वरुन किंवा iPad वरुन 'स्लिप मोड' मध्ये टाकू शकता. यावरती वेगळी पोस्ट लिहिलच पण सध्या AutoResponder मेसेज कसा सेट करायचा ते पाहूयात.
सर्वात प्रथम Mail app ओपन करा. तुम्ही तुमचा मेल आयडी अगोदरच सेट केला असणारच.
menu bar मधे Mail वर क्लिक करुन मग preferences…वर क्लिक करा. (यासाठी +, हा किबोर्ड शॉर्टकट वापरता येईल.)
preferences window ऊघडल्यावर जनरल, अकाऊंटस्, जंक मेल सारखे अनेक पर्याय दिसतील. त्यात सगळ्यात शेवटी Rules हा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा.
ऊजव्या बाजुला असलेल्या टॅबमधला सगळ्यात वरती "Add Rule" हा टॅब असेल. त्यावर क्लिक करा.


जी window ओपन होईल त्यात तुम्हाला हवे ते पर्याय निवडा. जसे conditions. विशिष्ट मेल आयडी, ग्रुप वगैरे.
नंतर action निवडा. म्हणजे आलेला मेल redirect करायचा आहे की delete करायचा आहे. किंवा आलेला मेल forward करायचा आहे की त्या मेलला reply द्यायचा आहे. मला येथे reply द्यायचा असल्याने मी "Reply to Message" हा पर्याय निवडला आहे.


"Reply to Message" हा पर्याय निवडल्यावर त्यापुढे "Reply message text…" हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर text window ओपन होईल. तिथे तुम्हाला हवा तो मेसेज टाईप करा. मी येथे उदाहरण म्हणून जरा विनोदी मेसेज टाईप केला आहे.
आता OK वर क्लिक करा.


तुमचा text message सेव्ह झाला असेल. आता परत OK वर क्लिक करा.
झाले. तुमचा AutoResponder मेसेस सेट झाला आहे. आता स्वतःलाच एक 'test mail' पाठवून पहा. तुम्हालाच तुम्ही सेट केलेला AutoResponder Message येईल. (मी येथे उदाहरण म्हणून विनोदी मेसेज टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मेसेज टाका.)
जेंव्हा तुम्ही परत ऑफीसमधे याल, किंवा जेंव्हा तुम्ही मेलला ऊत्तरे देवू शकता तेंव्हा preferences मधे जावून तुम्हाला नको असलेल्या Rule पुढील बॉक्स अनचेक्ड करा. (+, हा किबोर्ड शॉर्टकट तुम्हाला पुर्ण Mac वर कुठेही, कोणत्याही ॲपच्या preference साठी वापरता येईल.) म्हणजे तुमचे AutoResponder बंद होईल. जोपर्यंत तुम्ही AutoResponder सुरु करत नाही तोपर्यंत AutoResponder बंद राहील. थोडी कल्पकता दाखवली तर ही AutoResponder ची सुविधा फार ऊपयोगी आहे. वापरा आणि मला सांगा ही टिप तुम्हाला ऊपयोगी वाटली का? Mail App विषयी अजुन महत्वाच्या टिप्ससाठी सविस्तर पोस्ट लिहिनच येथे.

(मराठीत सांगायचे असल्याने जरा गोंधळ ऊडतो आहे. व्यवस्थित समजुन सांगता येत नाही. हळू हळू सफाई येत जाईलच. तेंव्हा जरा अवघड विषयांकडे वळेन. आतापुरते समजुन घ्या. सुचना असल्यास सांगा.)

lke

Share With

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...

                                                          नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि ...

Popular Posts