share

If you have any quotation about this tips, let me know by commenting. Thank You ___पद्मनाभ

Mac OS

Thursday, 3 May 2018

One Click Quite

One Click Quiet.

आज आपण फार ऊपयोगी असलेली tip पाहूया. मला स्वत:ला ही टिप फार ऊपयोगी येते.
Mac वर काम करताना आपल्याला एकाच वेळी अनेक apps वापरावे लागतात. पण Mac / MacBook जेंव्हा sleep mode वर टाकताना सर्व apps आपल्याला Quit करावी लागतात. त्यासाठी ⌘+tab आणि ⌘+Q हा किस्ट्रोक प्रत्येक app साठी वापरावा लागतो. जे जरा कंटाळवाणं होतं. तर आता पाहूया one click मधे सर्व प्रोग्राम Quit कसे करता येतील.
यासाठी प्रथम Spotlight Search (⌘+Space) वापरुन Automator लाँच करा. (किंवा Application मधूनही ओपन करता येईल) 
Automator window ओपन झाल्यानंतर "Application" choose करा.
 Search box मधे "Quit" टाइप करा. खाली आलेल्या option मधून "Quit all" हा पर्याय ऊजव्या बाजूला drag करुन drop करा.

आता file menu मधे जाऊन save करा. Save करताना तुम्हाला समजण्यास सोपे असलेल्या नावाने save करायला विसरु नका. ऊदा. "Quit everything". तुमचे app "Application window" मधे save झालेले असेल.

या नविन app चा icon हा Automator चा default icon असेल. जो पटकन समजण्यास जरा अडचणीचा होतो. त्यामुळे तुम्हाला आवडेल असा icon नेटवरून डाऊनलोड करा. (शक्यतो transparent png. पुढच्या पोस्ट मधे png icon image कशी करायची ते सांगेणच.) आणि तो नविन app साठी वापरा. (तो कसा वापरायचा ते या अगोदरच्या पोस्ट मधे मी सांगीतलं आहेच. तरीही या व्हिडीओ मधेही ते दाखवलं आहे.) 
आता Application window ओपन करुन हे नविन app drag करुन dock वर तुम्हाला हवे तिथे place करा. बस. सर्व ईतकं सोपं आहे. आता तुम्ही ओपन असलेले सर्व apps एकाच क्लिक मधे quit करु शकता. काही समजलं नाही तर व्हिडीओ दिला आहेच. तरीही काही अडचण असेलच तर विचारायला संकोच करु नका. Enjoy this “one click quit” app tip.


No comments:

Post a Comment

lke

Share With

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...

                                                          नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि ...

Popular Posts