share

If you have any quotation about this tips, let me know by commenting. Thank You ___पद्मनाभ

Mac OS

Friday, 20 April 2018

Change Folder Icon



आज अगदी साध्या गोष्टीने सुरवात करु. माझ्या डेस्कटॉपवर अनेक फोल्डर असतात. ज्यात माझ्या वेगवेगळ्या कामाच्या फाईल्स असतात. पण सगळे फोल्डर आयकॉन हे डिफॉल्ट आयकॉन असतात. ते पहायला फार कंटाळवाणे तर होतेच पण जास्त फोल्डर्स असतील तर पटकन शोधायला जरा अवघड जाते. प्रत्येकवेळेस स्पॉटलाईट सर्च ऊघडत नाही कोणी. (खरं तर फारसे त्रासदायक नाही पण आपल्या विशिष्ट फोल्डरलाविशिष्टआयकॉन असला की छान वाटते.) माझ्या मिपावरील लेखांचे एक फोल्डर आहे ज्याचा डिफॉल्ट आयकॉन आहे. तर पाहूयात, तो कस्टम आयकॉन कसा करता येईल.
प्रथम तुम्हाला जो आयकॉन वापरायचा असेल तो डाऊनलोड करुन घ्या. या साठी अनेक वेबसाईट्स आहेत ज्या ऊत्तम आणि वैविध्यपुर्ण आयकॉन फ्रीमध्ये देतात. शक्यतो ही इमेज png (transparent background) असेल तर छान दिसेल. मीमिपाचा लोगो आयकॉन म्हणून वापरला आहे. आता ही इमेज कॉपी करा. त्या साठी ही इमेज प्रिव्ह्यू मध्ये ऊघडा. एडीटवर क्लिक करुनसिलेक्ट ऑलवर क्लिक करा.


नंतर कॉपी करा.



आता ज्या फोल्डरचा आयकॉन बदलायचा आहे त्या फोल्डरची info window ऊघडा. त्यासाठी फोल्डरवर राइट क्लिक करुन Get Info वर क्लिक करा किंवा +I हा किबोर्ड शॉर्टकट वापरा. Info Window ऊघडल्यानंतर त्यातील असलेल्या आयकॉनवर क्लिक करा. नंतर एडिट मध्ये जावून Paste वर क्लिक करा.


तुमच्या फोल्डरचा आयकॉन बदललेला असेल.



अर्थात ही माहिती कामासाठी फारशी ऊपयोगी नसली तरी जरा बदल म्हणून वेगवेगळे आयकॉन वापरुन पहायला काही हरकत नाही. पुढील सदरात ऊपयोगी टिप्स आणि ॲप्लिकेशन याबद्दल पाहू.

lke

Share With

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...

                                                          नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि ...

Popular Posts