share

If you have any quotation about this tips, let me know by commenting. Thank You ___पद्मनाभ

Mac OS

Friday, 25 May 2018

iCollections

तुम्हाला तुमचा डेस्कटॉप व्यवस्थित ऑर्गनाईझ करायचा असेल तर अनेक ॲप्स आहेत. याच ब्लॉगवर मीयोइंकबद्दल लिहिले आहेच. अजुनही बरीच ॲप्स आहेत. पण आज मी ज्या ॲपबद्दल सांगणार आहे ते जरा वेगळ्या पध्दतीने काम करते. जर तुम्ही डेस्कटॉप वापरत असाल तर स्क्रिनवर तुम्हाला जास्त जागा ऊपलब्ध असते. पण जर तुम्ही MacBook Air किंवा Pro वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला स्क्रिन ऑर्गनाईझ करायची गरज निर्माण होते.


हे ॲप आहे iCollections. हे ॲप Lite Version मध्येही ऊपलब्ध असल्याने तुम्ही विनामोबदला डाऊनलोड करु शकता. वापरु शकता. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही Pro Version डाऊनलोड करु शकता. वैयक्तीक मला मात्र फ्रि व्हर्जन पुरेसे वाटले.

iCollections मध्ये तुम्ही एक अशी जागा बनवू शकता जेथे तुम्ही तुम्हाला नेहमी लागणाऱ्या फाईल, फोल्डर किंवा काहीही साठवू शकता. किंवा एकाच प्रकारच्या फाईल ऑर्गनाईझ करु शकता. म्हणजे पेजेस फाईल, फोटो फाईल्स, ॲप्लिकेशन्स वगैरे. तसेच तुम्हाला नेहमी लॉगइन करावी लागणारी वेबसाईट तुम्ही डेस्कटॉपवर ठेवू शकता. तुम्हाला आवडणाऱ्या फोटोंचा स्लाईड शो स्क्रिनवर ॲरेंज करु शकता. यात अनेक सुविधा ऊपलब्ध आहेत त्या तुम्ही प्रत्यक्ष वापरुन पाहिल्यावर तुमच्या लक्षात येतीलच. नेहमी प्रमाणे खाली लिंक दिलेली आहेच. तुम्हालाही अशाच प्रकारचे किंवा तुम्हाला आवडलेले ॲप असेल तर त्या विषयी कॉमेंट मध्ये लिहायला विसरु नका.


तुम्ही येथुन iCollection डाऊनलोड करु शकता.








No comments:

Post a Comment

lke

Share With

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...

                                                          नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि ...

Popular Posts