iOS वापरताना आपल्याला accessibility shortcut चा खुप ऊपयोग होतो. या shortcut मुळे AssistiveTouch, Invert Colors, Color Filters, the Magnifier, Reduce White Point, Smart Invert, VoiceOver आणि Zoom या सारखे फिचर्स कुठेही आणि सहजपणे वापरता येतात. उदाहरणार्थ, Magnifier feature चा ऊपयोग आपण बऱ्याच वेळेला करतो. तर हे सगळे फिचर्स वापरण्यासाठी आपण iOS मध्ये म्हणजे iPad किंवा iPhone मध्ये किमान 9 Shortcut वापरु शकतो. म्हणजे यातील एक निवडू शकतो. तर या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की Accessibility Shortcut कसा कस्टमाईझ करायचा. आणि हो, अर्थात हेही सांगेन की तो वापरायचा कसा.
iOS मध्ये Accessibility Shortcut कसा सेट करायचा:
- सेटिंग ॲप ऊघडा.
- सेटिंग मध्ये "General" ला क्लिक करा व "Accessibility" मध्ये जा.
- स्क्रिनच्या सगळ्यात शेवटी "Accessibility Shortcut" हे ऑप्शन असेल.
- त्यावर क्लिक केल्यावर 9 प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील.
- Assistive Touch
- Classic Invert Color
- Color Filters
- Magnifier
- Reduce White Point
- Smart Invert Color
- Switch Control
- VoiceOver
- Zoom
- जेंव्हा तुम्हाला हवे असतील ते ऑप्शन सिलेक्ट केले की सेटींग मधून बाहेर या. तुम्ही सिलेक्ट केलेले Shortcut सेव्ह झालेले असतील.
Accessibility Shortcut कसे वापरायचे:
हे Shortcut वापरायचे म्हणजे अर्थात Home Button असणारे डिव्हाईस हवे हे ओघानेच आले. कारण Home Button वरच हे Shortcut वापरता येतात. Shortcut वापरण्यासाठी Home Button विशिष्ट लयीत, गतीत तिन वेळा दाबावे लागेल. पण तुम्ही जर iPhone X वापरत असाल तर तिन वेळा Side Lock (Power Button) दाबून तुम्हाला सिलेक्ट केलेले Accessibility Shortcut वापरता येतील.
तुम्ही जर एकच Shortcut निवडला असेल तर ’triple clicking’मुळे तो सुरु होईल. पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडले असतील तर 'तिन वेळा' क्लिक केल्यानंतर हवा तो Shortcut निवडण्यासाठी मेन्यू ओपन होईल.
तुम्ही Home Button दाबण्याचे स्पिड सेटिंग्ज मध्ये बदलू शकता.
काही प्रश्न किंवा शंका असतील तर विनासंकोच 'प्रतिसादा'मध्ये विचार. ऊत्तर द्यायला आवडेल मला.
No comments:
Post a Comment