share

If you have any quotation about this tips, let me know by commenting. Thank You ___पद्मनाभ

Mac OS

Wednesday, 9 May 2018

Keyboard Shortcuts

तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही हवे असलेले किबोर्ड शॉर्टकट बनवु शकता. अर्थात या साठी HotKey सारखी ॲप मदत करतात पण Mac OS वरही तुम्हाला हवे ते शॉर्टकट तुम्ही बनवू शकता. हे किस्ट्रोक एखाद्या विशिष्ट ॲपसाठी अथवा ठरावीक menu option साठी बनवू शकता. कसे ते पाहूयात.

How to Make Keyboard Shortcut in Mac OS

Mac OS च्या प्रत्येक व्हर्जनवर हे किबोर्ड शॉर्टकट बनवता येतात.
  1. प्रथम ॲप्पल मेनूमध्ये जा. तेथे “System Preferences” मध्ये जा आणि “Keyboard” पॅनेल वर क्लिक करा.
  1. वरती अनेक पर्याय (Tab) असतिल, त्यातुन "Shortcuts" वर क्लिक करा. Shortcuts वर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या साइड मेनू मधून ॲप शॉर्टकट हा पर्याय निवडा.
  1. खाली "+" आणि "-" हे दोन्ही चिन्हे असतील. अगोदर असलेला एखादा शॉर्टकट काढून टाकण्यासाठी किंवा नविन बनवण्यासाठी. आपल्याला शॉर्टकट बनवायचा असल्याने "+" वर क्लिक करा.
  2. Application समोरच्या विंडो मध्ये असलेल्या पर्याया मधून एक निवडा. म्हणजे तुम्ही तयार करत असलेला शॉर्टकट सगळ्या Application साठी हवाय की एका ठरावीकच Application साठी हवाय. मी येथे All Application हा पर्याय निवडला आहे

  1. आता दुसरी विंडो आहे "Menu Title" या विंडो मध्ये तुम्हाला जो शॉर्टकट बनवायचा आहे त्याचे तंतोतंत नाव लिहा. स्पेलिंग अथवा अप्पर-लोअर केस जरी चुकली तरी तुमचा शॉर्टकट काम करणार नाही. येथे मी  फाईल मेनु मधे असणाऱ्या "Rename" साठी शॉर्टकट बनवत आहे.
  2. किबोर्ड शॉर्टकटवर क्लिक करा. तुम्हाला जो किबोर्ड शॉर्टकट हवाय तो प्रेस करा. मी येथै +=R हा घेतलाय. तुम्ही निवडलेला शॉर्टकट Keyboard Shortcut समोर दिसेल. सर्व झाल्यानंतर "Add" म्हणजेच "+" बटनवर क्लिक करा. Rename साठी तुमचा किबोर्ड तयार आहे. आता एखादे ॲप ओपन करा. File वर क्लिक करा आणि पहा तुमचा शॉर्टकट Add झालाय की नाही ते. सोपे आहे.

  1. एक काळजी मात्र घ्या. तुम्ही निवडलेला शॉर्टकट दुसऱ्या कशासाठी अस्तित्वात नाही याची खात्री करा.
  2. Spelling  आणि Capitalisation तपासून घ्या.
  3. Keynote सारखे ॲप ओपन करुन तुमचा शॉर्टकट लगेच वापरुन पहा.

All Application निवडले असेल तर menu item option असलेल्या प्रत्येक Application साठी हा शॉर्टकट तेच काम करेल ज्याच्यासाठी तो बनवला आहे.
Specific Application निवडले असेल तर हा शॉर्टकट फक्त तुम्ही निवडलेल्या Application साठीच काम करेल. थोडा सराव झाला की तुमच्या लक्षात येईल याचा कसा कसा ऊपयोग करता येईल ते.


कशी वाटली टिप? या छोट्या छोट्या Tips आणि Tricks मुळेच तुम्ही Mac Master व्हाल हे नक्की. तुम्ही जर एखादा हटके असलेला शॉर्टकट बनवला असेल तर तो कॉमेंट मध्ये नक्की शेअर करा.

No comments:

Post a Comment

lke

Share With

❝ॲप्पल ज्युस❞ या ब्लॉग विषयी थोडेसे... ...

                                                          नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS  (iPad आणि ...

Popular Posts