Mac OS वर स्पॉटलाईट सर्च ला पर्याय म्हणून मी Launcher हे ॲप वापरतो. यात अनेक फिचर्स असे आहेत जे स्पॉटलाईट मध्ये मिळत नाहीत. आणि पर्याय म्हणजे दोन्ही ॲप तुम्ही एकाच वेळी वापरु शकता. Launcher मुळे नक्कीच कामाचे स्पिड वाढते.
*** Application Launcher ***
हे ॲप लॉंच करण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत.
यातही स्पॉटलाईट सारखेच पर्याय ऊपलब्ध आहेत. ॲप्लिकेशनचे नाव टाईप केले की त्वरीत ते ॲप ओपन होते. किंवा त्याच नावाचे साधर्म्य असलेली ॲप्सची लिस्ट alphabetical order मध्ये दिसते.
तुम्ही abbreviations वापरु शकता, ऊदाहरनार्थ, “qtp” हे QuickTime Player साठी, “ab”हे Address Book साठी, “rml” हे Remind Me Later साठी टाईप करु शकता.
*** File Browser with QuickLook option ***
यात इनबिल्ट असलेले File Browser तुम्हाला जलद व सोप्या पद्धतीने फाईल्स किंवा फोल्डर्स शोधायला मदत करते.
*** Web Searches ***
तुम्ही वापरत असलेल्या ब्राऊझरवर सर्च करण्यासाठी तुम्हाला खुप सोप्या कमांडद्याव्या लागतात. Google, Yahoo, Bing, eBay, Youtube, आणि Wikipedia यावर तुम्ही सर्वकाही सर्च करु शकता. जसे; Google साठी g, किंवा eBay साठी e, Wikipedia साठी w.
म्हणजे जर तुम्हाला eBay वर Apple शोधायचे असेल तर तुम्हाला फक्त "e apple" टाईप करायचे आहे. तुमच्या डिफॉल्ट ब्राऊझरमध्ये eBay च्या पेजवर असणाऱ्या सर्व apple चे प्रॉडक्टची लिस्ट ओपन होईल.
*** Commands ***
रोज वापराव्या लागणाऱ्या कमांड Launcher मुळे खुप सहजते वापरता येतात. जसे Mute, Play/Pause, Restart, Shutdown and others.
*** Dictionary ***
Launcher चा ऊपयोग तुम्ही superfast dictionary म्हणून करु शकता. एखादा शब्द शोधा, त्याचा तुम्हाला सुटेबल अर्थ Launcher मध्येच कॉपी करुन ठेवा.
*** Advanced Calculator ***
Launcher चा वापर multi-precision calculator म्हणूनही करता येतो. ज्यावर तुम्हाला साधे आणि अवघड कॅल्क्युलेशन करता येतात.
ऊदाहरणार्थ, “1/4+1/2”, किंवा “pi”, किंवा “sqr4761” *** Actions for search results ***
Launcher तुम्हाला खालील गोष्टी सहजतेने करायला मदत करते
- Open;
- Reveal in Finder;
- QuickLook;
- Copy Path.