बरेचदा आपल्याला काहीतरी वाचत किंवा छानसे संगीत ऐकत झोपायची सवय असते. निदान मला तरी आहे. पण अडचण ही असते की संगीत ऐकता ऐकदा झोप लागून जाते आणि आपण निवडलेले संगीत एका मागून एक वाजत रहातात. अगदी पुर्ण रात्र. पण जर तुम्ही iPhone, iPad किंवा iPod वर संगीत ऐकत असाल तर तुम्हाला यावरती ऊपाय आहे. तुम्ही प्ले केलेले म्यझीक कधी थांबावे हे तुम्ही ठरवू शकता. हे फिचर iOS मध्ये inbuilt असुन त्यासाठी तुम्हाला कोणत्याही 'थर्ड पार्टी ॲप’ची आवशयकता नाही. कसे ते पाहूयात.
Fall asleep listening to music with your iPhone or iPod touch
या पध्दतीने तुम्ही ठरवलेल्या वेळेत iPhone, iPad किंवा iPod सुरु असलेले संगीत आपोआप बंद करेल.
- Clock या ॲपवर क्लिक करा.
- आता Timer वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला डाव्या बाजुला 'तास', मध्ये 'मिनिट्स' आणि ऊजव्या बाजुला 'सेकंद' दिसतील. तुम्हाला किती वेळाने म्युझिक बंद व्हायला हवे तितका वेळ सेट करा.
- आता खाली असलेल्या 'When Timer Ends' दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर निवडण्यासाठी अनेक टोन दिसतील. सगळ्यात खाली ’Stop Playing' हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता ’Start’ बटनवर क्लिक करा.
बस्, ईतकेच. आता तुम्हाला तुमच्या फोनच्या बॅटरीची काळजी करायला नको.
No comments:
Post a Comment