Copy and Paste between devices
Mac OS आणि iOS डिव्हायसेसमध्ये हे फार ऊपयोगी फिचर आहे. iPhone वर बरेचदा काही तर सर्च करत असताना काही ऊपयोगी माहीती किंवा ईतर काही चांगले मिळते. AirDrop वापरावे लागते अथवा स्वतःलाच इमेल करावा लागतो. पण अशावेळेस Universal Clipboard ची फार मदत होते. iOS किंवा Mac OS वर कुठेही ईमेज, फोटो, टेक्स्ट किंवा व्हिडीओ सुध्दा कॉपी केले तर ते Universal Clipboard वर सेव्ह होते. एकदा Universal Clipboard वर सेव्ह झाले की तुम्ही तुमच्या कोणत्याही डिव्हाईसव पेस्ट करु शकता. ऊदाहरनार्थ iPad वर सफारीमध्ये तुम्ही एखादा फोटो कॉपी केला तर Mac वर पेजेसमध्ये तुम्ही तो पेस्ट करु शकता. या फिचरला Continuity म्हणतात. त्यासाठी अगोदर Handoff सेटअप करावे लागेल. हे वापरण्यासाठी अपडेटेड Mac OS व iOS हवे. त्याची लिस्ट खालील फोटोत दिली आहे.
आता पाहुयात Handoff कसे सेटअप करायचे.
Set up Handoff
Handoff वापरण्यासाठी तुमचे डिव्हायसेस जवळ जवळ असायला हवीत.
तुमचे प्रत्येक डिव्हाईस एकाच Apple ID सह iCloud वर साईन केलेली असावीत.
प्रत्येक डिव्हाईसचे Wi-Fi आणि Bluetooth ऑन असायला हवीत.
Mac वरती ॲप्पल मेन्यू () निवडा. तेथून System Preferences मध्ये जा. असलेल्या ऑप्शनमधून “Allow Handoff between this Mac and your iCloud devices.” निवडा. iPhone, iPad वरही Handoff एनेबल करा.
Use Handoff
तुमच्या कोणत्याही एका डिव्हाईसवरती Handoff ला सपोर्ट करणारे ॲप ओपन करा. (Mail, Maps, Safari, Reminders, Calendar, Contacts, Pages, Numbers, Keynote, and numerous third-party apps.)
ओपन केलेल्या ॲपवर काहीही काम सुरु करा. जसे न्यु ईमेल एडीट करा अथवा पेजेसमध्ये नवे डॉक्युमेंट टाईप करायला सुरवात करा.
तुमच्या दुसऱ्या डिव्हाईसवर डॉकमध्ये त्याच ॲपच्या आयकॉनवर लहानसे आयकॉन दिसेल.
क्लिक करा आणि दुसऱ्या डिव्हाईसवर काम सुरु करा.
Cool
ReplyDelete