Spotlight हे माझं फार आवडतं आणि ऊपयोगी फिचर आहे. Apple ला जितके म्हणून धन्यवाद म्हणू तेव्हढे कमी आहेत या फिचर साठी. Spotlight चा ऊपयोग मी किती वेळा करतो सांगताच येणार नाही. तरीही आपण पाहूयात की या Spotlight चा वापर करुन कुठेही, http://gifgifs.com/animations/computers-technology/lamps-and-bulbs/Bulb_flashes_2.gifम्हणजे एखाद्या ॲपमध्ये असताना एखादी URL ओपन करण्यासाठी करता येईल का? तर हो. तुम्ही पेजेस, किनोट किंवा अजुन कुठेही काम करत असाल तरीही तुम्हाला हवे ते डोमेने उदा. padmanabhpro.blogspot.in अथवा पुर्ण लिंक ओपन करायची असेल तर करु शकता. पाहूयात कसं ते.
Spotlight च्या मदतीने Mac OS वर एखादी वेबसाईट कशी ओपन करायची:
Spotlight च्या अनेक ऊपयोगी ट्रिक्स पैकी ही एक आहे. तुम्ही जितके जास्त Spotlight वापराल तितक्या त्यातल्या अनेक गमती तुम्हाला कळतील. (बाकिच्या Spotlight Tricks विषयी लिहिन सावकाश.)
- Mac OS वर काम करताना तुम्ही कुठेही असा, म्हणजे पेजेस किंवा आयमुव्ही वगैरे, ⌘+Spacebar दाबले की स्पॉटलाईट बार स्क्रिनवर दिसेल.
- आता तुम्हाला हवी असलेली URL टाइप करा. उदा. padmanabhpro.blogspot.in
- आणि फक्त return (enter) दाबा.
तुमचे जे डिफॉल्ट ब्राऊझर असेल (माझे सफारी आहे. तुमचे क्रोम किंवा दुसरेही असू शकते. त्याने काही फरक पडत नाही.) त्यात ही साईट नविन टॅबमध्ये ओपन होईल.
बरेचजण आपले ब्राऊझर ओपन करुन त्यात हवी ती URL टाईप करतात. पण त्यापेक्षा Spotlight वापरणे खुप सोपे आणि जलद गतीने काम करते. Spotlight चा वापर तुम्ही गुगल सर्च सारखाही करु शकता.
वरील स्क्रिनशॉटमध्ये माझा डिफॉल्ट ब्राऊझर सफारी आहे पण तुम्ही कोणताही ब्राऊझर डिफॉल्ट म्हणून वापरु शकता. जसे Safari, Firefox, Chrome, Opera किंवा तुम्हाला योग्य वाटेल तो. सध्या ही टिप वापरुन पहा. Spotlight विषयी अजुन किमान हजार टिप्स आहेत. सांगेन त्याही.
तुमच्याकडे काही वेगळी आणि मस्त ट्रिक असेल स्पॉटलाईट विषयी तर कॉमेंटमध्ये लिहायला विसरु नका मित्रांनो.